ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये स्वागत, सत्कार व सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न

गारगोटी : 

श्री. मौनी विद्यापीठ संचलित, आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये बी.एड.प्रथम वर्ष छात्र प्रशिक्षणार्थ्यांचा स्वागत समारंभ, महाविद्यालयाच्या 2019-2021 बॅचच्या छात्र प्रशिक्षणार्थांचा सदिच्छा समारंभ व गुणवंत माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन आज महाविद्यालयांमध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौनी विद्यापीठाचे संचालक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. बेलेकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक व्ही. एन. भंडारे होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती देवीचे पूजन हे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिमा पूजन झाल्यानंतर युनिटी सोशल सायन्स क्लब व युनिक भाषा मंडळाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.आर. डी. बेलेकर व प्रा.व्ही. एन. भंडारे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व ओळख महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पी.बी. दराडे यांनी करून दिली. प्रमुख पाहुण्यांची ओळख झाल्यानंतर बी.एड. द्वितीय वर्ष छात्र प्रशिक्षणार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. बी.एड. प्रथम वर्ष छात्र प्रशिक्षणार्थींचे स्वागत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत करते वेळी प्रत्येक छात्र प्रशिक्षणार्थ्यांनी आपली ओळख करून दिली.

महाविद्यालयाच्या माजी प्रशिक्षणार्थी भाग्यश्री गवाणकर, तृप्ती गवाणकर, स्नेहल चव्हाण, प्रियंका सावंत, सायली खोत, अनुजा कुलकर्णी, प्रियांका सावंत, सोनाली यादव, अनुराधा साळवी चंद्रभागा डावरे यांनी राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा(CTET) मध्ये यश संपादन केल्याबद्दल प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार संपन्न झाला. त्याच बरोबर महाविद्यालयाकडून देण्यात येणारा २०२२ चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार महाविद्यालयाचे माजी प्रशिक्षणार्थी किरण मासाळ व महाविद्यालयात बी. एड. परीक्षेत सर्व प्रथम येणाऱ्यांना दिला जाणारा विश्वयोगी पुरस्कार अनिता पाटील यांना देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच गणेश कोडग या 2012-13 च्या माजी विद्यार्थ्याची सेंट झेविअर्स या अनुदानित शाळेत नियुक्ती झालेबद्दल सत्कार करण्यात आला.

प्रा.डॉ. एम. एन. मोरे मॅडम यांनी भाषा मंडळाची स्थापना करण्याचे महत्त्व प्रकटपणे मांडले. भाषा मंडळांमध्ये घेण्यात आलेले उपक्रम भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी राज्यभाषा दिन मराठी भाषा टिकवण्यासाठी खऱ्या अर्थाने या युनिक भाषा मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. याचे महत्त्व त्यांनी विस्तृतपणे मांडले.

सामाजिक शास्त्रे व इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर.के शेळके यांनी सामाजिक शास्त्रे मंडळाचे महत्त्व विशद करून मंडळाची उद्दिष्टे स्पष्ट केली. यामध्ये इतिहास विषय अंतर्गत घेण्यात आलेले महाविद्यालयांमधील उपक्रम आदर्श इतिहास शिक्षक मुलाखत, शिव जन्मोत्सव उपक्रम, प्रजासत्ताक दिन उपक्रम, राजर्षी शाहू जयंती उपक्रम,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर जयंती उव संविधान दिन उपक्रम सामाजिक शास्त्रीय मंडळातर्फे अशा विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यामागचा हेतू त्यांनी सुस्पष्ट केला.

सदिच्छा समारंभामध्ये महाविद्यालयाच्या माजी प्रशिक्षणार्थी यांनी आपल्याला आलेल्या शैक्षणिक वर्षांमधील अनुभव सांगितले. बी.एड. मध्ये प्रवेश घेताना वेळेपासून ते अंतिम संत्राच्या परीक्षेपर्यंतचे अनुभव त्यांनी प्रकटपणे मांडले. या अनुभवांमध्ये वेळोवेळी मार्गदर्शक यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच खऱ्या अर्थाने शिक्षक पेशाकडे वळण्याचा एक वेगळा अनुभव आला. पाठ कसा घ्यावयाचा? पाठ घेताना वेळची उद्दिष्टे काय? असतात. विद्यार्थ्यांमध्ये ती उद्दिष्ट कशा प्रकारे साध्य करावी लागतात यांचे संपूर्ण मार्गदर्शन महाविद्यालयाच्या मार्गदर्शकांनी केल्यामुळेच आज आम्ही यशस्वी शिखरावर पोहोचत आहोत. अशा प्रकारचे विविध अनुभव त्यांनी आपल्या मनोगत मधून व्यक्त केले.

प्रशिक्षणार्थी मनोगतामध्ये बी.एड.प्रथम वर्षाचे विद्यार्थी नेताजी पाटील व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी अनिल वारके यांनी महाविद्यालयाचा इतिहास तसेच महाविद्यालयांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या अध्यापन पद्धती व मार्गदर्शकांनी केलेले अनमोल मार्गदर्शन याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करून आलेले अनुभव सांगितले. तसेच महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या छात्र अस्मिता पाटील यांनी मार्गदर्शकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारी स्वरचित कविता सादर करून सर्वांची व्हावा मिळवली.

प्रमुख पाहुणे मनोगतामध्ये महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक व्ही. एन. भंडारे यांनी प्रत्येक शिक्षकाने आपल्या अध्यापनामध्ये भाषा व भाषा प्रभुत्वाकडे लक्ष दिले पाहिजे. जर आपली भाषा शुद्ध असेल तरच आपले भाषिक कौशल्य वाढत जाते. शुद्धलेखन हा शिक्षकाचा अमुलाग्र भाग असतो. त्याचे आचरण प्रत्येक शिक्षकाने आपल्या जीवनामध्ये करावे असे मार्गदर्शन त्यांनी आपल्या मनोगतामध्ये केले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये मौनी विद्यापीठाचे संचालक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. डी. बेलेकर यांनी शिक्षक व शिक्षण ही संकल्पना समजावून सांगितली. तसेच आपण कृतज्ञ आहे आपल्यावर त्यांचे उपकार असतात त्यांच्याविषयी आपण कृतज्ञ राहिले पाहिजे ही कृतज्ञता म्हणजे म्हणजे आपले मार्गदर्शक असतात. महाविद्यालयाचा प्राध्यापक वृंद हा विशेष गुणवत्ता प्राप्त केलेला वर्ग आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यशाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत. खऱ्या अर्थाने ही आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची गुणवत्ता आहे. येथील प्राध्यापक वृद्धांचा नियमित मार्गदर्शनामुळेच आज पहिल्याच प्रयत्नात छात्रप्रशिक्षणार्थी शिक्षक पात्रता परीक्षा, सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होत आहेत. हा खऱ्या अर्थाने मौनी विद्यापीठाचा नाव लौकिक वाढवणारा क्षण आहे. मौनी विद्यापीठ हे खऱ्या अर्थाने विद्येचे माहेर घर या प्राध्यापकांना मुळेच बनलेले आहे. या प्राध्यापकांचे महत्त्व या विद्यापीठाशी संलग्न आहे. खऱ्या अर्थाने या मौनी विद्यापीठांमधून जो शिक्षण घेतो तो सामाजिक दृष्ट्या सक्षम होतो असे मत त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष छात्र कृष्णात कांबळे व दिग्विजय हळदकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजीत मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नियोजन द्वितीय वर्षाचे छात्र प्रशिक्षणार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी प्रेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी बेलेकर यांची मिळाली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रा.डॉ .पी.बी.दराडे,प्रा. पी. एस. देसाई,प्रा.डॉ .आर.के.शेळके,प्रा.डॉ.एम.एन.मोरे,प्रा.एस.आर बाड व शिक्षकेतर कर्मचारी व प्रथम व द्वितीयचे प्रशिक्षणार्थी व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता प्रथम वर्ष छात्र पल्लवी महाडिक यांनी आभार मानून केली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks