ताज्या बातम्यामहाराष्ट्र
प्रणवी वाडकर हिची महावितरणच्या ज्युनियर असिस्टंट पदी निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
व्हन्नाळी (ता.कागल) येथील प्रणवी प्रल्हाद वाडकर हिची महावितरण वीज कंपनीमध्ये अकाऊटंट विभागाच्या ज्युनियर असिस्टंट पदावरती निवड झाली आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अगदी वयाच्या 23 व्या वर्षी तिने स्पर्धा परीक्षेमधून हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी कौतुक केले. तिला आई संपदा वाडकर, वडील प्रल्हाद वाडकर,मामा सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.