भारतीय संविधान हा सर्वोच्य कायदा आहे – न्यायाधीश मा.बी.डी. गोरे ; देवचंद मध्ये कायदेविषयक व भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम संपन्न

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा असून लामध्ये भारतीय नागरिकाचे मुलभूत अधिकार, सहकारी संस्थांची कर्तव्ये, सरकारच्या विधायी, कार्यकारी आणि न्याय मंडळाची रचना, तसेच देशाच्या राज्यकारभारासाठीचे मार्गदर्शक तत्वे आहेत असे प्रतिपादन कागल कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश मा. बी डी. गोरे यानी केले.
देवचंद कॉलेज व कागल तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने कायदे विषयक शिबीर भारतीय सविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्य देवचंद कॉलेज अर्जुननगर ता. कागल येथे आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
पुढे बोलताना न्यायाधीश डी. बी. गोरे म्हणाले की, समाजात आपण वावरत असताना आपण सर्वांनी प्रसंगावधान राखले तर होणारे हल्ले व सहन करावी लगणारी मानहानी टाळता येते. मुलींच्या शैक्षणिक-समृद्धीविषयी कायदयातील तरतूदी विद्यार्थीनीनी माहिती करून घ्यावी.यावेळी कागल कनिष्ठ न्यायालयाचे सहन्यायाधीश श्रीमती पी .एस. पाटील उपस्थित होत्या.
यावेळी मुरगूड पोलीस उपनिरिक्षक श्री. एम.डी.करे यानी रस्ता सुरक्षा व वाहतूक सिग्नल विषयी मार्गदर्शन केले. तसेच ॲड. मिलिंद पाटील यांनी राष्ट्रीय युवा दिनाबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर सार्वजनिक उपयोगिता सेवा आणि केंद्र-राज्य शासनाच्या योजनेविषयी ॲड संभाजी दावणे यानी मार्गदर्शन केले व बेटी बचाव, बेटी पढाव याबद्दल ॲड अभिजित शितोळे यानी विचार मांडले आणि भारतीय संविधानाबद्दल ॲड अभिजीत सांगावकर यानी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्या प्रो.डॉ.जी.डी. इंगळे यानी महाविद्यालयातील संविधानाबाबत घेतल्या उपक्रमांचा आणि प्रगतीचा आढावा घेऊन केले.याप्रसंगी कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या संगिता जाधव,पर्यवेक्षक डॉ. अशोक डोनर, देवआशिष लॉ कॉलेजचे प्राचार्य मा. प्रभारी प्राचार्य अँड.एस.ए.गुळवणे, अँड . कृष्णात खाडे,डॉ. रविंद्र चव्हाण, डॉ. अमोल नारे डॉ. आशालता खोत. प्रा. एन.एम मधाळे, डॉ. सी. एम कनमाडी ,प्रा.एस जी कुंभार प्रा.पी.बी.पाटील प्रा.महेश दिवटे ,शिवदास चव्हाण, वैभव सोनार, सिद्धू बेडर तसेच लॉ कॉलेजचे विद्यार्थी, व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
या कार्यक्रमास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ.सौ तृप्तीभाभी शाह ,खजिनदार सुबोधभाई शाह यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन डॉ.सुजाता पाटील यांनी केले तर प्रा तुकाराम पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर आभार प्रा चेतन चौगुले यांनी मानले.