ताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्र
मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष धनाजी ईश्वरा गोधडे (डीआयजी) यांचे निधन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष व अन्नपूर्णा शुगर चे विद्यमान संचालक धनाजी ईश्वरा गोधडे यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूरच्या खासगी दवाखान्यात निधन झाले .
त्यांच्या निधनाचे सांयकाळी चार वाजता वृत्त समजताच मुरगूडवर शोककळा पसरली होती . धनाजी गोधडे यांना डीआयजी नावाने ओळखले जात होते . त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा,तीन मुली,चार भाऊ व एक बहिण असा मोठा परिवार आहे.
बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक बाजीराव गोधडे यांचे ते कनिष्ठ बंधू होत . रक्षाविसर्जन गुरुवार दि १६ जानेवारी सकाळी ९ वाजता मुरगूड (जांभूळखोरा ) येथे आहे .