ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : कुदनूर येथील सचिन आंबेवाडकर यांची निवड

चंदगड प्रतिनिधी/पुंडलीक सुतार
कुदनूर ता.चंदगड येथील सुपुत्र सचिन अर्जुन आंबेवाडकर यांची सरळसेवेतून जी प कोल्हापूर साठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड झालेने तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.त्यांचे शिक्षण बी इ सिव्हिल पर्यँत झाले असून लेखी परीक्षेत त्यांना 200 पैकी 170 गुण प्राप्त झाले असून.सध्या ते महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला या ठिकाणी ड्रॉफ्ट्समन पदावर कार्यरत आहेत.यासाठी त्यांना वडील सेवानिवृत्त लेफ्टनंट अर्जुन यांचा आशीर्वाद, तर आई श्रीमती सुमन,भाऊ सुधीर,भावजयी सौ लक्ष्मी, पुतणी शीतल,बहीण सौ सुरेखा गडहिंग्लज, यांचे मोलाचे योगदान लाभले.