कोल्हापूर : नरसिंह कॉलनी येथील नागरिकांनी लावला मतदान बहिष्काराचा फलक

कोल्हापूर प्रतिनिधी :
फुलेवाडी रिंग रोड येथील नरसिंह कॉलनी येथील गल्ली क्रमांक 2 आणि 3 पासून नरसिंह कॉलनी मुख्य रस्त्या पासून कॉलनी ला जोडणारा वहिवाट चां रस्ता गेली 50 वर्षे अस्तित्वात आणि वापरत आहे.
पण अलीकडे एका बांधकाम व्यावसायिकाने सदर रस्ता वर आपली खाजगी जागा आहे असे सांगून ती बळकावण्याचा प्रयत्न केला आहे.काही दिवसांपूर्वी त्या बांधकाम व्यावसायिकाने रस्त्यावर कंपौ ड ,संरक्षक भिंत घालण्याचा प्रयत्न केला होता.तो जागरूक नागरिकांनी बंद पाडला.
या कॉलनी त आज अंतर्गत रस्ते चे काम चालू असताना त्या बांधकाम व्यावसायिकाने हा रस्ता मुख्य रस्त्याशी जोडू देणार नाही कारण माझी जागा यामध्ये येते असे सांगितले.म्हणून संतापलेल्या नागरिकांनी झाला तर पूर्ण रस्ता होवू दे नाही तर अर्धवट रस्ता नको अशी आक्रमक भूमिका घेतली.
आक्रमक झालेल्या नागरिकांनी आमच्या वहिवाट चां रस्ता नाही तर मतदान नाही.अशी भूमिका घेवून तशा आशयाचा फलक मुख्य रस्त्यावर उभा केला .यावेळी माजी नगरसेवक अमोल माने यांनी या आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी सुहास आजगे कर , सनी वनारसे,सचिन देसाई. नीलम बामनिकर, वैशाली कोळप्ते ,ज्योती ठाकूर, तेजस्विनी चींदगे, रागिणी सडोलिकर, प्रकाश दुकले, शकर दाभाडे, विजय कळजवडेकर, शिवाजी उंडाळे संजय मचले. आदी.नी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.