स्व.सदाशिवराव मंडलिक यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त इंग्रजी हस्ताक्षर व इंग्रजी वाचन स्पर्धा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सालाबाद प्रमाणे चालू वर्षीही सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड मधील इंग्रजी विभागाच्या वतीने दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान यांनी इंग्रजी हस्ताक्षर व इंग्रजी वाचन स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
ग्रामीण भागातील महाविद्यालयीन युवक युवतींना इंग्रजी भाषेतून लिखाण व वाचन या कलांवर प्रभुत्व मिळवता यावे यासाठी गेली दहा वर्षे हा उपक्रम अव्याहतपणे प्रा. प्रधान घेत आहेत. चालू वर्षी सर्व विद्याशाखातून एकूण 46 स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. पुढील स्पर्धकांनी या स्पर्धेत प्राविण्य मिळवले. इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेत कु. तन्वी नामदेव जाधव (B.Com. I) हिने प्रथम , कु. सानिका सावंता कुणकेकर (BCA Ⅱ) हिने द्वितीय व कु. आरती परशुराम गिरिबुवा (B.A.I) हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
तर इंग्रजी वाचन स्पर्धेत पृथ्वीराज दिपक पाटील (B.Sc.1) यानेप्रथम ,कु. शबनम कमालपाशा मुल्ला (B.A.Ⅱ) हिने द्वितीय , आणि कु. प्रतिक्षा भिकाजी वरूटे (BCAⅡ) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. या विजेत्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या सायन्स विभाग प्रमुख प्रा. सौ. प्रीतम गायकवाड व सौ. कुराडे यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक स्टाफ, प्रशासकीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि मुरगुडवासीयांकडून विजेत्यांचे अभिनंदन होत आहे.