ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिद्री : मोटारसायकल घसरून पडल्याने ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

बिद्री प्रतिनिधी :

बिद्री साखर कारखान्यापासून जवळच असलेल्या गोकुळ दूध संघाच्या बोरवडे शीतकरण केंद्रानजीक मोटारसायकल घसरून रस्त्यावर पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. नितीन आनंदराव खांबे (वय अंदाजे ४२, मूळ रा. इस्लामपूर, सध्या रा. तुरंबे, ता. राधानगरी) असे त्याचे नाव आहे. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

तुरंबे येथील नितीन खांबे हे कामानिमित्त मुदाळतिट्टा येथे इलेक्ट्रीक मोटारसायकलवरूव (एम एच ०९ जी सी ६०२१) चालले होते. गोकुळच्या बोरवडे शीतकरण केंद्राजवळ आल्यावर मोटारसायकल स्लीप झाल्याने ते रस्त्यावर आपटले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks