चंदगड : दाटे च्या सरपंचपदी किरण नाईक यांची निवड

चंदगड प्रतिनिधी/पुंडलीक सुतार
दाटे ता.चंदगड ग्रुप ग्रामपंचायत साठी वरगाव येथील किरण बसवानी नाईक यांची बहूमतांनी निवड झालेने वरगाव,बेळेभाट,नरेवाडी,दाटे, नाईकवाडा आदी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच भरमु आण्णा पाटील व शिवाजीराव पाटील गटाचे सरपंच विजयी झालेबद्दल तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.निवड अधिकारी म्हणून मंडल निरीक्षक दयानंद तारडे यांनी काम पाहिले.
ग्रा. पं. स्थापन झालेपासून उपसरपंच पद मिळत होते.60 वर्षात दाटे गाव सोडून सरपंच पद मिळत नव्हते मात्र यावेळी किरण नाईक यांना सरपंच पदाची संधी मिळाली आहे.या संधीचे मी सोने करीन व गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करेन व सदस्यांनी माझेवर जी जबाबदारी सोपविलेली आहे ती मी पार पाडेन असे यावेळी बोलताना किरण नाईक यांनी सांगितले.
ग्रामसेवक एकनाथ सूर्यवंशी यांनी नूतन सरपंच यांचा सत्कार केला.आभार संजय जाधव ग्रा.पं. सदस्य यांनी मानले यावेळी माजी सरपंच अमोल कांबळे व सर्व सदस्य हजर होते.