ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवत मुरगुड शहरांमध्ये ग्रंथदिंडी उत्साहात

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
वेळ सकाळी आठची, मुख्य बाजारपेठेतील प्रत्येक दारात सडा रांगोळी, तालुक्यातील बालचंमुची मांदियाळी, लेझीम, लाठीकाठी, ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारी अनेक विद्यार्थ्यांनीची सजिव कला या सर्वांच्या वेगळ्या वातावरणाची निर्मिती अशात सजवलेल्या पालखीत रचनात्मक दृष्ट्या ठेवलेली पुस्तके घेऊन निघाली ग्रंथ दिंडी अतिशय उत्साहात संपन्न झाली.
औचित्य होते पंचायत समिती शिक्षण विभाग कागल व मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज कागल यांच्या वतीने आयोजित 51व्या कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शन व ग्रंथ दिंडी सोहळ्याचे.
मुरगुड शहरातील मुख्य बाजारपेठेत दुतर्फा सडा रांगोळी काढण्यात आली होती.हलगीच्या तालावर कंरजिवणे येथील मुलींनी ताल धरला.लाठी काठी फिरु लागली. ठिक ठिकाणी झिम्मा फुगड्या,भाकरी भाजणे,दळण दळणे, जात्यावरील ओवी,लोणी काढणे, तांदूळ निवडणे,आदि सजिव कृतीचा समावेश होता .नागरीक, विद्यार्थी पहाण्यात दंग होऊन गेले होते.
यानंतर आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील होते. मुरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप घार्गे, पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर बिद्रीचे माजी संचालक दत्तात्रय खराडे,एस.आर. पाटील गटशिक्षणाधिकारी गणपती कमळकर, आवेलीन देसाई, महादेव गुरव सुनील पाटील, एन.पी.फराक्टे, रामभाऊ खराडे रवींद्र भोई रमेश कांबळे प्रकाश एकल दत्तामामा जाधव अनंत फर्नांडिस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रणजीत सिंह पाटील ,गणपतराव कमळकर, दिपक भांडवलकर, संदिप घार्गे यांची भाषणे झाली. चमत्कार सादरीकरणातून वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर सुनील स्वामी यांचे व्याख्यान झाले.स्वागत एस.बी.पाटील यांनी सुत्रसंचलन अनिल पाटील यांनी तर आभार एस.पी.पाटील यांनी मानले.
विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी….
मुरगुड विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये उपकरण मांडणीमध्ये नवा उच्चांक निर्माण झाला आहे. विद्यार्थी शिक्षक यांनी तयार केलेली उपकरणे पाहण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली. परिसरातील नागरिकांनी ही विज्ञान प्रदर्शन पाहण्याचा लाभ घेतला.