श्री. स्वयंभू दुध संस्था घोटवडे येथे वसुबारस निमित्त गोमातेचे पूजन

कौलव प्रतिनिधी :
श्री.स्वयंभू दुध संस्था घोटवडे यांचे वतीने आज रमा एकादशी, गोवत्स व्दादशी व वसूबारस या अमृत योगा निमित्त गोमाता व वासरू पुजनाचा कार्यक्रम संस्थेच्या व्हा चेअरमन सुजाता कातीवले आणि सर्व सभासद महिलांच्या उपस्थित पार पडला.
यावेळी संस्थेच्या व्हा चेअरमन सुजाता कातीवले यांनी बोलताना गोमातेला कोणतीही इजा न करता तीची चांगल्या प्रकारे जपणूक करावी असे आवाहन केले. याप्रसंगी सौ.संगिता उत्तम डोंगळे, सौ.साधनाताई सदाशिव डोंगळे, सौ.सुजाता संजय डोंगळे, सौ.संध्या सर्जेराव डोंगळे, सुवर्णा दत्तात्रय डोंगळे, सौ.उज्वला साताप्पा व्हडगे, सौ.मंगल धनाजी डोंगळे, सौ.मेघा सतिश डोंगळे, सौ.सुनिता आनंदा डोंगळे, सौ.राजश्री शिवाजी डोंगळे, सौ.पल्लवी राजाराम डोंगळे यांचे हस्ते गोमातेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सदस्य मा.श्री.भिकाजी डोंगळे, मा.श्री.उत्तम डोंगळे, अशोक डोंगळे, महेश डोंगळे तसेच सेक्रेटरी नामदेव डोंगळे,शिवाजी डोंगळे , सभासद उपस्थित होते.