ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आंतरराज्य सामान्यज्ञान स्पर्धेत खुल्या गटात तारिहाळकर तर लहान गटात वारंग प्रथम

चंदगड प्रतिनिधी : रुपेश मऱ्यापगोळ
शिवनेरी सार्वजनिक तरुण मंडळ कारवे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या आंतरराज्य सामान्य ज्ञान स्पर्धेत खुल्या गटात बेळगावच्या मेघन तारिहाळकर यांनी, तर लहान गटात हेरेच्या प्रांजल वारंग हिने प्रथम क्रमांक पटकावला. मोठ्या गटात सचिन ओवळकर, ज्योतिबा चौगुले, प्रसाद मोरे तर लहान गटात पियुष पाटील,साधना कोकितकर शरण्या पाटील यांनी गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
यावेळी सरपंच शिवाजी तुपारे, गोपाळ बोकडे रमेश यादव, दिलीप परीट नरसिंग बोकडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बोकडे यांनी तर निनाद पाटील यांनी आभार मानले.