चंदगड : तुडये येथील ऋतिका शहापुरकर बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदकाने सन्मानित

चंदगड/पुंडलीक सुतार
तुडये ता.चंदगड येथील ऋतिका रामलिंग शहापुरकर हिने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून इचलकरंजी येथे झालेल्या झोनल बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले तर इस्लामपूर येथे झालेल्या इंटर झोन बॉक्सिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली.
सदर ठिकाणी तिने सुवर्णपदक जिंकत पंजाब येथील मोहाली चंदिगढ विद्यापीठ येथे होणाऱ्या ऑल इंडिया स्पर्धेसाठी तिची निवड झालेने गावासह तालुक्यातून तीचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सध्या ती शिवराज कॉलेज गडहिंग्लज येथे बी.कॉम.शाखेत शिकत असून घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही आई वडील मोल मजुरी करून तिला पुढील शिक्षण देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.
सदर स्पर्धेसाठी तिला कोच म्हणून सुनील सुतार व राहुल मगदूम यांचे मार्गदर्शन मिळत आहे तर या कामी तिला माजी सभापती जगन्नाथ हुलजी,वडील रामलिंग, आई सौ शीतल,आजी श्रीमती लक्ष्मी,भाऊ प्रेम,बहीण राखी,चुलते शाम,चुलती सौ संगीता, चुलतभाऊ चैतन यांची प्रेरणा मिळाली.