समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्तच्या शिष्यवृत्ती सराव परिक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद ; ३६ केंद्रांवर ५८८०विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कागल,करवीर,गडहिंग्लज व आजरा या चार तालुक्यातील छत्तीस केंद्रावर ५८८०विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ही परीक्षा दिली.राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून सलग एकोणीसाव्या वर्षी ही परिक्षा झाली. आज अखेर एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असल्याची माहिती यावेळी संयोजकांनी दिली.
बाचणी ता.कागल येथे परीक्षेचा प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन समारंभ झाला.शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
गटशिक्षणाधिकारी डाॕ. जी.बी.कमळकर विस्तार अधिकारी सारिका कासोटे आर एस गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश कांबळे तानाजी तारदाळे राजू सावर्डेकर आदींनी या परीक्षेचे नियोजन केले.
यावेळी अमरसिंह घोरपडे म्हणाले,शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे,शाहू कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे ,सौ.नवोदिता घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक उपक्रम राबवित आहोत.यापैकी एक उपक्रम असलेल्या शिष्यवृत्ती सराव परिक्षेचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. अपुऱ्या सुविधा असतानाही मेहनती शिक्षकांच्यामुळे कागल तालुका शैक्षणिकदृष्ट्या जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.यावेळी सरपंच जयश्री पाटील, बाळासाहेब खामकर, उत्तम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास शाहूचे माजी संचालक आर.के.पाटील,संचालक सचिन मगदूम, भाऊसाहेब कांबळे,वसंतराव पाटील,संजय पाटील,युवराज पाटील,बाजीराव पाटील,रमेश पाटील,निवास पाटील,बाळासो खामकर,अनिल जोशी,अन्सार नायकवडी,आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक आवेलीस देसा यांनी स्वागत केले. एस. के .पाटील यांनी आभार मानले.