धक्कादायक : सख्या भावाच्या हल्यात बहिणीचा झाला खून ; लिंगनूर कापशीमध्ये फासेपारधी समाजात प्रकार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बहिणीला पळवून नेवून विवाह केला. त्यानंतर दाजी बहिणीला माहेरी पाठवत नाही. याबद्दलचा राग मनात धरून दाजीचा काटा काढण्यासाठी केलेला वार बहिणी आडवी आली आणि दाजीच्या ऐवजीं बहिणीचा खून झाला.सख्या भावांनी केल्याची घटना लिंगनूर ( कापशी ) येथे घडली . यासंबधी मुरगूड पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे . यातील आरोपी मृत महिलेचे सख्खे भाऊ फरारी आहेत .
अधिक माहिती अशी : बुलढाणा येथील फासेपारधी समाजातील सिकसेन मुरलीधर भोसले ( वय ४५ ) याने खामगाव जि. अमरावती येथील येवनबाई पवार हिच्या सी सन२००७ साली प्रेम प्रकरणातून पळून जावून प्रेम विवाह केला होता त्यानंतर पती सिकसेन हा पत्नी येवन बाईला माहेरी पाठवत नव्हता . याचा राग मनात धरुन येवनबाईचे भाऊ देवेंद्रप्पा आदमास पवार व टायटन आदमास पवार ( रा.अंजनगाव ‘ जि. अमरावती ) यांनी मंगळवारी ( दि. ६ रोजी ) सांयकाळी आपला मेव्हणा सिकसेन भोसले यास आपल्या लग्नाच्या सत्काराच्या बहाण्याने लिंगनूर ( कापशी ) या ठिकाणी बोलवून घेतले .
आल्यानंतर देवेंद्रप्पा व टायटन पवार या दोघांनी आपल्या बहिणीला माहेरी का पाठवत नाहीस म्हणून जाब विचारला . या वादातून त्यांच्यात हाणामारी सुरु झाली . यावेळी पवार बंधूंनी सिकसेन भोसलेला भाल्याच्या पात्याने भोसकण्याचा प्रयत्न केला तेंव्हा सिकसेनच्या डाव्या बाजुच्या खांद्याला पाठीमागून भाला घासून गेला एवढयात सिकसेनची पत्नी येवनबाई आडवी येत आपल्या नवऱ्याला मारू नका अशी विनवणी करु लागली पण तीच्या भावानी ( पवार बंधू ) तीला न जुमानता येवनबाईच्या डाव्या बाजूच्या छातीवर भाल्याने भोसकले यात ती जागीच ठार झाली .
मेव्हण्याचा काटा काढता काढता भावांनी बहणीचाच घात केला . यानंतर या भावांनी तेथून पलायन केले . ते अद्याप फरार आहेत . पोलीस त्यांच्या शोधात आहेत . या खून प्रकरणी मुरगूड पोलीसात देवेंद्रप्पा व टायटन पवार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे .
मृतदेह मुरगूडमध्येच दफन !
बुलढाण्याच्या महिलेचा परमुलूखात खून . ना कोणी भाऊबंद व ना कोणी नातेवाईक मृतदेह शवविच्छेदनानंतर पाठवायचा कोणाकडे ? अखेर पोलिसानीच मुरगूड नगरपालिकेच्या मदतीने येथील स्मशानभूमी शेजारीच दफन केला . यावेळी मृत येवनबाईचा पती सिकसेन व तीची निरागस दोन मुले शोकाकूल अवस्थेत व खिन्न मनाने उपस्थित होती .