कोनवडे :विनायक पाटील यांची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजरपदी निवड

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोनवडे (ता.भुदरगड) गावचे सुपुत्र विनायक तानाजी पाटील यांची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजरपदी निवड झाल्याबद्दल जयहिंद सहकार समूह कोनवडे यांचेमार्फत सत्कार करण्यात आला .
यावेळी जयहिंद सरकार समूहाचे संस्थापक प्रा . हिंदुराव पाटील यांनी विनायकच्या कष्टाचे चीज झाल्याचे सांगितले .अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्याने हे यश मिळवून तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे यातून युवकांनी प्रेरणा घ्यावी असे मत व्यक्त केले .
यावेळी पी .आय . पाटील, पी .के .पाटील ,वाय.के .पाटील आदींनी मनोगते व्यक्त करताना विनायकच्या मेहनतीची प्रशंसा केली व सदिच्छा दिल्या .यावेळी जयहिंद विकास सेवा संस्था चेअरमन मा. आनंदराव महादेव पाटील यांच्या हस्ते सत्कार करणेत आला .
सत्काराला उत्तर देताना विनायक पाटील यांनी या सत्काराने प्रेरणा मिळाली असून नजिकच्या काळात यापेक्षा मोठे यश निश्चितच मिळेल अशी ग्वाही दिली . यावेळी सखाराम पाटील , टी एल .शिंदे, के . बी . पाटील विलास पाटील ,तुकाराम पाटील ,कृष्णात कांबळे, तानाजी पाटील , बाळासो पाटील ,दयानंद पाटील आदीसह सभासद उपस्थित होते . आभार यशवंत लोकरे यांनी मानले .