ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल चा प्रस्तावित “फ्लायओव्हर” पांडे समितीच्या प्रस्तावामध्ये घ्यावा : राजे समरजीतसिंह घाटगे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कागलमध्ये होणाऱ्या भरीव उड्डाणपुलाचे याआधी दिलेले टेंडर रद्द करून नव्याने प्रस्तावित कराडच्या धर्तीवर तयार करण्यात येणाऱ्या फ्लायओव्हरचे टेंडर रिटायर्ड मेंबर आर के पांडे समितीच्या प्रस्तावामध्ये समाविष्ट करावे.अशी मागणी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे दिल्ली येथे भेट घेऊन केली. त्यास मंत्री गडकरी यांनी सकारात्मकपणे अनुकुलता दर्शविली आहे.अशी माहिती घाटगे यांनी दिली.

कागलमध्ये होणारा उड्डाणपूल हा भरीव न करता कराडच्या धर्तीवर पिलरचा व्हावा, अशी मागणी याआधी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली होती.त्यानंतर मंत्री गडकरी यांच्या सूचनेनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी कागलमध्ये येऊन पाहणीही केली होती. आता त्याच्या पुढील कामकाजासाठी रिटायर्ड मेंबर आर.के. पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. येत्या 22 ते 24 डिसेंबर दरम्यान कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तिन्ही राज्यांच्या रस्त्यांच्या सद्य परिस्थिती संदर्भात गोव्यामध्ये होणाऱ्या आढावा बैठकीमध्ये हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.पूर्वी दिलेल्या भरीव उड्डाणपुलाचे टेंडर रद्द करून कराडच्या धर्तीवर तयार करण्यात येणाऱ्या फ्लायओव्हरचे टेंडर या कमिटीने प्रस्तावामध्ये समाविष्ट करावे.अशी आग्रही मागणी घाटगे यांनी केली आहे.

कागलचा फ्लायओव्हर कराडच्या धर्तीवर उभारन्यास प्राधान्यक्रम देऊ…..
केंद्रीय वाहतूक मंत्री नाम.नितीन गडकरी यावेळी म्हणाले,श्री आर.के.पांडे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 22 ते 24 डिसेंबर दरम्यान तीन राज्यातील रस्त्यांच्या सद्यस्थितीबाबत गोवा येथे बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये कागलमध्ये पूर्वी दिलेल्या भरीव उड्डाणपूलाचे टेंडर रद्द करून कराडच्या धर्तीवर फ्लायओव्हर उभारण्यासाठी प्राधान्यक्रम देऊ.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks