आजरा : समाजसेवक नरसु शिंदे यांच्यावतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
समाजसेवक नरसु शिंदे यांच्या वतीने कोळिंद्रे (ता.आजरा) येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वह्या व पेन्सिल चे वाटप समाजसेवक नरसु शिंदे, सुभाष सावंत,पत्रकार दिनकर पाटील,पत्रकार पुंडलिक सुतार व मान्यवर व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी पत्रकार दिनकर पाटील होते.यावेळी उपस्थित पालक व मान्यवर व्यक्तिंचे स्वागत करण्यात आले.
तालुक्यामध्ये मलिग्रे, आजरा ,वाटंगी तसेच हेळेवाडी ,गडहिंग्लज,चंदगड आदी ठिकाणीही वह्यांचे वाटप करण्यात येत आहे .सदर वह्यांचे वाटप शिंदे हे स्वखर्चाने करीत असून समाजसेवक नरसु शिंदे यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे .असाच उपक्रम शिंदे यांनी सुरू ठेवावा इतरांना दानशूर बनण्यासाठी प्रेरणा मिळेल असे मत मान्यवर व्यक्तींनी व्यक्त केले .
सूत्रसंचालन शरद उंडगे यांनी केले आभार पत्रकार पुंडलिक सुतार यांनी मानले .यावेळी विघ्नेश पाटील,नारायण कांबळे, राजू कांबळे, रेणुका लोखंडे अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स सौ पूजा कांबळे, अमित पाटील,व विद्यार्थी उपस्थित होते.