ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुडच्या सुरेखा सुतार यांचा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते सत्कार

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता.कागल येथील आरोग्यसेविका सुरेखा संजय सुतार यांनी आयुष्यमान गोल्डन कार्ड या योजनचे काम जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाने पूर्ण केल्याबद्दल त्यांचा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .त्या कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करतात.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर ,माजी आमदार अमल महाडिक, कागल तालुका आरोग्य अधिकारी फारुख देसाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते.