ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : लोकसभेत कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी गॅलरीतून मारली उडी

लोकसभेचे कामकाज सुरू असताना दाेन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्‍याची धक्‍कादायक घटना आज (दि.१३) दुपारी घडली. या प्रकारामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर दुपारी दाेन वाजेपर्यंत सहभागृहाचे कामकाज तहकूब करण्‍यात आले आहे. दरम्‍यान, संसदेवरील दहशतवादी हल्‍ल्‍याचा २१ व्‍या स्‍मृति दिनच झालेल्‍या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

आजच्‍या प्रकारामुळे संसदेची सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्‍याचा दावा विराेधी पक्षाचे सदस्‍य करत आहेत.

या घटनेबाबत माहिती देताना लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, “दोन तरुणांनी गॅलरीतून उडी मारली आणि त्यांच्याकडून काहीतरी फेकले गेले ज्यातून वायू बाहेर पडत होता. त्यांना खासदारांनी पकडले, त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. आज आम्ही 2001 मध्ये (संसदेवर हल्ला) बलिदान दिलेल्या लोकांची पुण्यतिथी साजरी केली. यानंतर झालेला हा प्रकार हा नक्कीच सुरक्षेचा भंग आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks