ताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझी उमेदवारी स्वाभिमानासाठी आणि शेतकऱ्यासाठी ; बिद्रीच्या निवडणूकीत माझा विजय निश्चित : प्रा . चंद्रकांत जाधव

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

बिद्री साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी मी अपक्ष म्हणून लढत आहे . माझी उमेदवारी ही स्वाभीमानासाठी आणि शेतकऱ्यांसाठी आहे . या निवडणूकीत मला उत्स्फूर्त प्रतिसाद व वाढता पाठिंबा मिळत असल्याने माझा विजय निश्चित आहे असे ठाम मत अपक्ष उमेदवार प्रा . चंद्रकांत जाधव यांनी पत्रकार बैठकीत सांगितले .प्रा.जाधव इतर मागासवर्गीय गटातून निवडणूक लढवत आहेत.

मी नेत्यांच्याकडे उमेदवारी मागितली होती व त्यांना विचारूनच उमेदवारी अर्ज दाखल केला . पण पॅनेल रचनेत माझा विचारच केला गेला नाही त्यामूळे माझ्या स्वाभीमानावर गदा आणण्यात आली . लोकशाहीनुसार व संविधानानुसार निवडणूक लढवण्याचा मला हक्क आहे . म्हणून मी बिद्री साखर कारखान्याच्या निवडणूक आखाडयात उतरलो आहे .

कारखाना कार्यक्षेत्रातील चारही तालुक्यात माझा जनसंपर्क मोठा आहे . माझ्या उमेदवारीचे सामान्य शेतकरी सभासदांकडून समर्थन मिळत आहे . गेली पंचवीस ते तीस वर्षापासून माझा समाज व राजकारणासी संबध आहे . नगरसेवकापासून अनेक पदे होती या अनुभवाचा मला फायदाच होइन या कारखान्याची ऐतिहासिक व भौगोलिक अशी सर्वांगीण माहिती मला आहे . त्यामूळे कारखान्याचा कारभार सभासदाभिमूख करण्यासाठी आपले प्राधान्य राहणार आहे तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबध्द असून संचालक म्हणून संधी मिळाल्यास ऊस उत्पादन वाढविण्यासाठी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवणार . ऊसतोडणी कार्यक्रम नियोजनबध्द राबविणार . कारखान्याच्या शैक्षणिक संकुलास गतवैभव प्राप्त करून देणार असल्याचे प्रा जाधव यांनी सांगितले .

सूज्ञ सभासद मतदारांच्या पाठिंब्यामूळे माझा विजय निश्चित असल्याची ठाम खात्री प्रा . चंद्रकांत जाधव यांनी या प्रसंगी व्यक्त केली .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks