आप्पाचीवाडीजवळ मोटर सायकल व कार अपघातात चारजण गंभीर जखमी

आप्पाचीवाडीजवळ अंधार लक्ष्मी मंदीर परिसरात मोटर सायकल व कार यांच्यात अपघात झाल्याची घटना सोमवार तारीख 13 रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली.यामध्ये मोटर सायकल वरील दोघे तर कार मधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोलाहून आदमापूर येथील बाळूमामा दर्शनासाठी जात असलेल्या कार व मोटर सायकलची धडक येथील अंधार लक्ष्मी मंदीरजवळ झाली.
यामध्ये तानाजी कोळी (वय 40), दत्तात्रय ठोंबरे (वय 39), दोघे रा. बिड व लता लिगडे (वय 45), सविता लिगडे (वय 47) रा. सांगोला हे गंभीर जखमी झाले.हायवे रुग्णवाहिकेतून कार मधील जखमींना महात्मा गांधी रुग्णालयात तर मोटर सायकल वरील जखमींना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.घटनास्थळी एएसआय एस आय कंभार, पी डी घस्ती यांनी भेट देऊन पाहणी केली.
जखमी युवक कारच्या जोरदार धडकेमुळे जवळच असणाऱ्या शेतात जाऊन पडले होते. गंभीर जखमी युवकांना भाटनांगनूर येथील सोमनाथ माळी व दत्तवाडी येथील रवी पाटील यांनी रस्त्यावर आणून रुग्णवाहिकेत बसवून पाठवले.