दिल्ली येथे होणाऱ्या शालेय पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी अविनाश तसीलदार यांची निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी शिवराज विद्यालय जुनिअर कॉलेज मुरगुड च्या अविनाश मारुती तसीलदार याची निवड अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 120 किलो वजन गटांमध्ये सुवर्णपदक मिळवून नेत्र दीपक कामगिरी करत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे राष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये निवड होणारा शिवराजचा पहिलाच खेळाडू त्याला ए एस पावर चे प्रशिक्षक सुशांत नलवडे, प्रा.सुशील अकोळकर, क्रीडा शिक्षक एकनाथ आरडे यांचे मार्गदर्शन तसेच जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी खासदार संजय मंडलिक, कार्याध्यक्ष वीरेंद्र भैया मंडलिक,अध्यक्ष गजानन गंगापुरे,कार्यवाह आण्णासो थोरवत, प्राचार्य जी के भोसले,प्रा एस. एन. अंगज,उपप्राचार्य एल. व्ही.शर्मा, प्रा.आर जी पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले.