ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मुरगूड च्या अमृता पुजारीला ब्राँझ पदक

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पणजी ,गोवा येथे सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाची (SAI) मल्ल अमृता शशिकांत पुजारी हिला ७६ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळाले आहे.
हरियाणाची जागतिक पदक विजेती रितिका हुडा हिने अमृताला प्रथम कुस्तीत मात दिली.(१०/४).
ब्राँझ च्या लढतीत अमृताने केरळच्या अंजुमोल हिला व राजस्थानची अंकिता कनवार यांना मात दिली व मिळालेल्या संधीचे सोने केले.
आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासो लवटे ,वस्ताद सुखदेव येरूडकर,दयानंद खतकर,सागर देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.खासदार संजय मंडलिक,वीरेंद्र मंडलिक,राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण , आण्णासो थोरवत , प्रशांत आथणी,जय शिवराय एज्युकेशन सोसायटी , कोल्हापूर जिल्हा तालीम संघ, मुरगूड नगरपरिषद इत्यादींचे प्रोत्साहन लाभले.