पन्हाळा : आसगाव येथे राष्ट्रीय विधी सेवा दिन उत्साहात संपन्न

कळे -वार्ताहर अनिल सुतार
तालुका विधी सेवा समिती कळे-खेरीवडे यांच्या मार्फत आसगाव ता. पन्हाळा येथे राष्ट्रीय विधीसेवा दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराकरिता ॲड .प्रशांत. एस पाटील यांनी विधीसेवेचे महत्व व त्याचा तळागाळातील गरजू लोकांना असणारा फायदा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर ॲड एस.व्ही खोत यांनी ग्रामपंचायतीचे अधिकार व कार्ये या विषयावर माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळे खेरीवडे न्यायमूर्ती श्रीमती व्ही. ए लावंड-कोकाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विधी सेवेचा उपयोग महिलांचे व ज्येष्ठांचे अधिकार व हक्क याचे सविस्तर महत्त्व विशद केले.
सदर कार्यक्रमास जेष्ठ विधीज्ञ ॲड के.बी देसाई, ॲड पी.एस पाटील, ॲड एस.व्ही खोत, ॲड व्ही ,एस पाटील ,ॲड शहाजी पाटील, ॲड अमोल नाईक आसगाव ग्रामपंचायत सरपंच मानसिंग भोसले ,सदस्य भारत पाटील यासह सर्व सदस्य, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिवाणी न्यायालय क स्तर कळे-खेरीवडे सहा. अधिक्षक आर.डी सोनुले, यु.एन खटावकर, एस. एस साळुंखे, ए. व्ही कदम यांचे सहकार्य लाभले.