कुरणी पुलावरील धोकादायक वाहतूक ताबडतोब बंद करा ; नागरिकांची मागणी

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड जवळील वेदगंगा नदीवरील कुरणी बंधारा अधिच कमकुवत आहे .त्यावरून अवघड वाहतूक सुरू आहे.पूल अरुंद तर आहेच पण अवजड वाहनासाठी अत्यंत धोकादायक आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना अवघड वाहनांना बंदी असे बोर्ड असुनही अनेक जण त्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक करत असतात.असे चित्र आहे.
कुरणी पूल म्हणून ओळखला जाणारा हा संपूर्ण देशातील कोल्हापुरी पद्धतीचा पहिला बंधारा आहे. मुरगूड चे तत्कालीन नगराध्यक्ष विश्वंनाथराव पाटील यांनी धरण समितीची स्थापना करून हा पहिला बंधारा बांधला होता.त्या नंतर असे अनेक बंधारे झाले .
सर्वात जुना असलेल्या या बंधाऱ्याचे तळाचे आधार स्तंभ सद्या कमकुवत झाले आहेत.मध्यंतरी थोडी डागडुगी झाली असली तरी अवजड वाहनांना कायमची बंदी घालण्यात आली आहे.असे असतांना या कमकुवत बंधाऱ्यावरून अवघड वाहनांची वाहतूक सुरू आहे.ही वाहतूक बंधारा व अवजड वाहने अशा दोन्हींनाही अत्यंत धोकादायक आहे.
या वाहतुकीला बंदी घालावी अशी मागणी मुरगूड , कुरणी,भडगाव, मळगे बु.येथील नागरिकांनी केली आहे.या बंधाऱ्यावरून शेकडो मुले मुली सायकल व इतर हलक्या वाहनातून मुरगूड मध्ये शिक्षणासाठी येत असतात. बाजार दिवशी तर हा रस्ता गर्दीने गजबलेला असतो .
पावसाळ्यात किमान दोन महिने या बंधाऱ्यावरून पाणी वहात असते .बंधाऱ्याचे आयुष्य व कमकुवतपणा लक्षात घेऊन ऊस वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी नाहीतर पूल बचाव रास्ता रोको आंदोलन करावे लागेल असा इशारा शिवभक्त मंडळ व युवक संघटनांनी दिला आहे.