ताज्या बातम्यामहाराष्ट्र
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला प्रशासकीय बाबी, वैद्यकीय विद्यालयांची बांधकामे व अंदाजपत्रकीय बाबींचा आढावा

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात वैद्यकीय शिक्षण विभागाची बैठक झाली. या बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रशासकीय बाबी, वैद्यकीय विद्यालयांची बांधकामे, पदभरती, अंदाजपत्रकीय बाबी इत्यादीबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने कामकाजाबाबत सादरीकरण केले.
बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी , अन्न व औषध प्रशासनाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, उपसचिव श्रीमती वैशाली सुळे, उपसचिव अजित सासुलकर, उपसचिव श्रीमती श्वेतांबरी खडे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त, संचालक व अधिकारी उपस्थित होते.