आजरा : हंदेवाडीच्या एन.डी. रेडेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

गडहिंग्लज प्रतिनिधी/पुंडलीक सुतार
हंदेवाडी ता.आजरा येथील सुपुत्र व शिवाजी विद्यालय महागाव चे हिंदी विषय शिक्षक एन.डी. रेडेकर यांना गडहिंग्लज तहसील हिंदी अध्यापक समिती यांच्या वतीने या वर्षीचा आदर्श हिंदी अध्यापक पुरस्कार कै. सोमाप्पा ल. कोडोली यांच्या स्मरणार्थ देण्यात आला. सदर पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षक एल.एस.कोडोली व विवेकानंद हाय.व ज्युनि.कॉलेज गडहिंग्लज चे प्राचार्य पंडित पाटील यांचे हस्ते गडहिंग्लज हाय.गडहिंग्लज येथे प्रदान करणेत आला.
शिक्षक एन.डी.रेडेकर यांनी 33 वर्षे हिंदी विषयाचे उत्कृष्ट अध्यापन केले असून ते विद्यार्थिप्रिय शिक्षक आहेत त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या उत्कृष्ठ अशा शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार प्रदान करणेत आला.यासाठी त्यांना संस्थाध्यक्ष विजयकुमार पताडे, सचिव एस.बी.पोवार, इंद्रजित पताडे , प्रकाशभाई पताडे यांची प्रेरणा लाभली तर प्राचार्य एम.एस.कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला जिल्हा सदस्य एस.जे.कालकुंद्रीकर सर,तहसील हिंदी अध्यापक समितीचे अध्यक्ष बी.एम.मगदूम,उपाध्यक्ष ए. व्ही.दळवी,उपाध्यक्षा सौ.पी.आय.कंदगल, सचिव एम.बी.कुंभार, एम.बी.पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.