कोल्हापूर : म.न.पा.यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर शाळेचा शोभायात्रा स्पर्धेत द्वितीय क्रमांक

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती आयोजित शोभायात्रा स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला. आज शाहू स्टेडियम, कोल्हापूर येथे आयोजित शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात शोभायात्रा सादरीकरणाची सुवर्णसंधी शाळा व विद्यार्थांना प्राप्त झाली.
कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ , जिल्हाधिकारी तथा प्रशासक राहूल रेखावर , कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मंजुलक्ष्मी , प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस. के. यादव, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, बाळासाहेब कांबळे ,उषा सरदेसाई व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत सादरीकरण झाले.
शाळेच्या मुख्याध्यापिका गीता काळे यांच्या संकल्पनेतून विविधतेत एकता ही थीम शिरोभागी ठेवून शोभायात्रेचे सादरीकरण करण्यात आले.
महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, राजस्थान, आसाम, केरळ, कर्नाटक आदी राज्यातील संस्कृतीचे वैविध्यपूर्ण व विलोभनीय दर्शन शोभायात्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केले. शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता काळे , अरविंद मुरकुटे – पाटील , मंदाकिनी पाटील, वैशाली कोळी,वंदना भोपळे ,वैशाली पाटील , कविता रावळ , दिपक कुंभार , शिवाजी जाधव, शाळा व्यवस्थपन समिती सदस्य व पालक यांनी प्रयत्न केले.