ताज्या बातम्यामहाराष्ट्र
प्रजासत्ताक दिनानिमित्त आप तर्फे महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
प्रजासत्ताक दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने उद्यमनगर येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापालिकेत गेली अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्या ज्येष्ठ महिला महापालिका सफाई कर्मचारी अर्चना दाभाडे, राजश्री हेगडे, कविता बांदार, वंदना जाधव, माधवी माकडवाले, माया घाडगे, गीता देऊळकर, मालुबाई कांबळे, मंगल पवार, भारती माने, आनंदीबाई करडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत चोरगे, आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.