ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : पाटगाव धरणाच्या पाण्यावर उभारण्यात येणारा अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प अखेर रद्द

पाटगाव धरणाच्या पाण्यावर उभारण्यात येणारा अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प अखेर रद्द झाला आहे. अदानी ग्रुपने प्रकल्प रद्द केल्याचे पत्र दिल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. यामुळे भुदरगड तालुक्यातील नागरिकांच्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे. आमदार आबिटकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. दरम्यान पाटगाव धरणाच्या पाण्यावर भुदरगड तालुक्यातील 115 गावं अवलंबून आहेत.

भुदरगड तालुक्यातील पाटगाव मौनी सागर जलाशयातील पाण्यावर उभारण्यात येणारा अदानी हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प रद्द केल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. पाटगाव धरणाचे पाणी या प्रकल्पाला देऊ नये यासाठी मोठं जनआंदोलन उभारण्यात आले होते. मोर्चे तसेच ठिय्या आंदोलन सुद्धा स्थानिकांनी केले होते. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला पाणी न देण्याचा ठराव सुद्धा करण्यात आला होता. त्यानंतर आता हा प्रकल्पच रद्द करण्यात आला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. स्वतः अदानी ग्रुपतर्फे 23 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प रद्द केला असल्याचे कळविण्यात आले असल्याचे आबिटकर यांनी म्हंटले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks