ताज्या बातम्यामहाराष्ट्र
MPSC : राज्य सरकारची तब्बल 6 हजार जागा भरण्याची मागणी

टीम ऑनलाईन :
एमपीएससी(MPSC) विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच राज्यात एमपीएससी मार्फत मोठी भरती होणार आहे. कारण राज्य सरकारच्या विविध विभागात गट-अ, गट-ब आणि गट-क च्या जागा भरण्यासाठी मागणीपत्र दिलं आहे.
यात तब्बल 6 हजार 356 जागा भरण्याची गरज असल्याचे मागणीपत्र दिले असल्याची माहिती समोर आली आहे. एमपीएससी(MPSC) आयोगाला राज्य सरकारने तसं मागणीपत्र दिलंय. कोणत्या विभागात किती जागा भरणार याबाबत परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यामुळे लवकरच मोठी भरती निघणार आहे.