एकावडे ट्रस्ट राधानगरी यांचे वतीने पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी

कुडूत्री प्रतिनिधी :
कै.रेवताबाई एकावडे ट्रस्टच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरण पुरक वट सावित्री पौर्णिमा साजरी करण्यात आली. एकावडे ट्रस्ट यांच्या वतीने यावेळी विरंगुळा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.विजया निंबाळकर यांच्या हस्ते प्रत्येक महिलेला वृक्ष वाटप करण्यात आले.पर्यावरणाचा संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आला.
शाळेच्या आवारात महिलांच्या उपस्थित वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, आदी विषयावर उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम साजरा करण्यात आला. कोणत्याही उपक्रमात महिला प्रभावीपणे कार्य करत असतात म्हणून पर्यावरण संतुलनासाठी महिलांनी पर्यावरण पूरक उपक्रमात यापुढे मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान विरंगुळा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.विजया निंबाळकर यांनी केले. याप्रसंगी कै रेवताबाई एकावडे ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. लता एकावडे यांच्या हस्ते उपस्थित महिलांना वाण देण्यात आले यावेळी सौ.सीमा रासम, सौ.शितल रासम, सौ.स्मिता चव्हाण, सौ.मनीषा घोटणे, सौ.रंजना चव्हाण, सौ.अंजना चव्हाण, सौ.सुनीता चव्हाण यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.