ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल : ख्रिस्ती समाज बांधवांसाठी चर्च उभारू : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कागलमध्ये ख्रिस्ती धर्मांच्या समाज बांधवांसाठी सुंदर असे चर्च ऊभारू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागलमध्ये नाताळनिमित्त ख्रिस्ती धर्माच्या समाजबांधवांच्या मेळाव्यामध्ये मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. ख्रिस्ती समाज बांधवांच्या प्रार्थनेसाठी चर्च बांधून मिळावे, ही समाज बांधवांची मागणी होती. परंतु; जागेची अडचण होती. स्वतःहून जागा विकत घेऊन चर्च बांधून देऊ, असेही ते म्हणाले.कागल येथील न्यू लाईफ फेलोशिप चर्चच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, संस्थापक येशू ख्रिस्त यांनी स्थापन केलेला ख्रिस्ती धर्म जगात सर्वात मोठा धर्म आहे. या धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना त्यांना अनंत यातना सोसाव्या लागल्या. प्रचंड सहिष्णुता ही या धर्माची शिकवण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताना सुळावर चढवून त्यांच्या शरीरात खिळे ठोकणाऱ्यानाही त्यांनी “परमेश्वरा, त्यांना माफ कर. कारण; ते काय करत आहेत हे त्याना समजत नाही,” अशी दयेची प्रार्थना केली.

यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते विधवा माता -भगिनींना साड्यांचे वाटप व शाळकरी मुलांना कपड्यांचे वाटप झाले. कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल समाज बांधवांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. श्री. मुश्रीफ यांनीही समाज बांधवांना पुष्पगुच्छ देऊन नाताळच्या शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार ख्रिस्ती समाज बांधवांच्यावतीने यावेळी झाला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks