ताज्या बातम्यामहाराष्ट्र
बनावट औषधींविरोधात भारत सरकारचे कडक धोरण : दूषित कप सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंनंतर ७१ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस

बनावट औषधांविरोधात भारताने कडक धोरण स्वीकारले असून भारतात निर्मिती झालेल्या दूषित कप सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंनंतर ७१ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. ७१ पैकी १८ कंपन्यांना टाळे लावण्यास सांगण्यात आले आहे.
दर्जेदार औषधे उत्पादन करणारा देश म्हणून भारताची जगात ख्याती आहे. भारतीय औषधांबद्दल ज्या-ज्या वेळी शंका-कुशंका घेतल्या जातात त्या वेळी वस्तुस्थितीची सखोल माहिती घेऊन तपासणी केली जाते. केवळ निर्यातीकरिता एखादे नमुना तयार केला आणि तो अयशस्वी ठरल्यास सर्वच औषधी निकामी ठरते.
परंतु २० नमुन्यांना मंजुरी मिळते अाणि चार नमुने अयशस्वी ठरतात असे शक्य नाही. देशात दर्जेदार औषधांचे उत्पादना करण्याकरिता आम्ही जोखीम आधारित विश्लेषण करत आहोत.