नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ प्रोत्साहन अनुदान द्या : राजे समरजीतसिंह घाटगे यांची निवेदनाद्वारे मागणी

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राज्यातील महायुती सरकारने कर्जमाफीपासून वंचित 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र नियमित कर्जफेड करणारे शेतकरी शासनाच्या जाचक अटींमुळे अद्यापही 50 हजार रु.च्या प्रोत्साहनात्मक अनुदानपासून वंचित राहिले आहेत.त्यामुळे या अटी रद्द कराव्यात व वंचित सर्वांनाच हे अनुदान तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्ह्याचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य शासनाच्या प्रोत्साहन अनुदान योजनेमध्ये एप्रिल ते मार्च असा आर्थिक वर्षाचा निकष लावल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. सलग दोन वर्ष उचल व परतफेड दिसत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले आहे. याचा दूरगामी परिणाम चालू हंगामातील सेवा संस्थांच्या वसुलीवरील होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन या अटी-शर्ती रद्द कराव्यात व सरसकट 50 हजार रुपये चे अनुदान शेतकऱ्यांना मिळावे अशी विनंती श्री.घाटगे यांनी केली आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा प्रश्न मार्गी लावा….
जिल्ह्यात अंगणवाडी व सेविका व मदतनीस यांचा संप सुरू आहे. मागील सरकारने या सेविकांना दिलेले अनुदान अत्यंत तुटपूंजे आहे.आर्थिक अडचणींना नेहमीच त्यांना सामोरे जावे लागते.याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सरकारने या सेविका व मदतनीस यांचा प्रश्न ही मार्गी लावावा अशी विनंतीही श्री .घाटगे यांनी यावेळी केली.