संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुरगुडमधील ऐतिहासीक हुतात्मा चौकाची स्वच्छता

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुरगुडमधील ऐतिहासिक असे ठिकाण असणाऱ्या हुतात्मा तुकाराम चौक येथे शिवप्रेमींच्या वतीने स्वच्छता करण्यात आली.या स्वच्छता मोहिमेचे संयोजन ,सोमनाथ येरनाळकर,संदीप भारमल ओंकार पोतदार यांनी केले.
स्वच्छतेचे पुरस्कर्ते म्हणून संत गाडगेबाबा यांची ओळख आहे २० डिसेंबर रोजी गाडगेबाबा यांची पुण्यतिथी असते या पुण्यतिथीचे औचित साधून मुरगुड मधील शिवप्रेमी तरुण यांनी येथील ऐतिहासिक हुतात्मा तुकाराम चौकाची स्वच्छता केली. संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाते याचाच भाग म्हणून मुरगुड मध्ये स्वच्छता करण्याची नियोजन तरुणांनी केले.
त्यानुसार दुपारी दोन वाजता हुतात्मा तुकाराम चौक आणि परिसरात स्वच्छता या तरुणांनी केली हातामध्ये खराटा,झाडू घेऊन संपूर्ण चौक चकाचक केला.या चौकाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे आणि याच डिसेंबरच्या १९४२ च्या रात्री येथील स्वातंत्र सैनिकांनी गारगोटी येथे कचेरी वरती हल्ला करून स्वातंत्र लढ्यामधील चळवळीमध्ये भाग घेतला होता त्याचीच आठवण या चौकाला आहे म्हणून हे ठिकाण निवडल्याचे तरुणांनी यावेळी सांगितले.
यावेळी सर्जेराव भाट ,महादेव पाटील (भडगाव) ,जगदीश गुरव ,संकेत भोसले ,यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते