ताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुरंबे येथे तलाठी सतत गैरहजर ; ग्रामस्थांची गैरसोय होत असताना मनसेने घेतली दखल !

तुरंबे प्रतिनिधी : अरुण भारमल

राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील तलाठी  एम.आर. खपले हे तलाठी सज्जा येथे वारंवार गैरहजर राहत असून तुरंबे व म.कासारवाडा या दोन्ही गावातील लोकांना दाखले मिळवण्यासाठी वारंवार येर जऱ्या माराव्या लागत आहेत. व विद्यार्थ्यांची, शेतकरी वर्गाची खूप मोठी गैरसोयी होत आहे. त्याचबरोबर लोकांशी अरे राविच्या भाषेत बोलत आहेत. मोबाईल सतत बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही त्यांमुळे ग्रामस्थांना याचा नाहक त्रास होत आहे.

तलाठी यांना काम करण्यास जमत नसेल ही बाजरी दुसऱ्या ठिकाणी करून येथे नवीन तलाठी तात्काळ नेमण्यात यावे. सदर तलाठी याची योग्य ती दखल न घेतल्यास तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राहुल कुंभार यांनी राधानगरीच्या तहसिलदार  यांना देण्यात आले.

यावेळी उपस्थित राधानगरी तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, वैभव माने,दयानंद भोईटे,दिपक जरग,प्रशांत सनदी, जगदीश पाटील, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks