पेठ वडगाव : आदर्श विद्यानिकेतनमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात

मिणचे येथील आदर्श विद्यानिकेतनचा क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर किरण शिंदे, माजी विद्यार्थी प्रतिक भोसले, रोहित शिंदे, प्रणव भोपळे,ओंकार कांबळे, सागर कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी उपप्राचार्य एम. ए. परीट होते. किरण शिंदे यांनी बॉडी बिल्डींग शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मने जिंकली. रोहित शिंदे यांनी क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदान देण्यासाठी आदर्श विद्यार्थी सदैव तत्पर असल्याचा विश्वास व्यक्त केला.
प्रणव भोपळे या विश्वविक्रम फुटबॉल खेळाडूने फुटबॉलच्या विविध कसरती विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या. कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी योग, मल्लखांब, लाठीकाठी, कुस्ती आदी खेळांचे प्रात्यक्षिके सादर केली. मॅरेथॉन स्पर्धेत क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख एस. पी. पाटील यांनी केले. उपप्राचार्य एम. ए. परीट यांनी शैक्षणिक, क्रीडाविषयक प्रगतीचा आढावा घेतला, क्रीडा महोत्सवांतर्गत सांघिक १४ व वैयक्तिक १२ स्पर्धांचे आयोजन केले होते. ऑलिम्पिक सोहळ्याच्या उद्घाटनाच्या धर्तीवर करण्यात आले.