ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगुड : जांभूळखोऱ्यात गवा रेडयांचा संचार ; बंदोबस्ताची मागणी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगुड येथून जवळच असलेल्या जांभुळ खोऱ्यात गवा रेडयांचा संचार वाढला असून या परिसरातील शेती पीकांचे नुकसान होत आहे . वन विभागाने या गवा रेड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे .

गवा रेडयांचा कळप जांभूळखोरा -अवचितवाडी परिसरात आढळून येत आहे . येथील शेतकरी समीर गोरुले यांना मंगळवारी दुपारी गवा रेड्यांचा कळप दिसून आला . यासंबधी परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाला कळविले आहे .

जांभूळ खोऱ्यातील सदाशिव मेंडके , संतोष मेंडके ,भैरू इंदलकर ,तानाजी मसवेकर आदि शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस व ज्वारी पीकांची मोठया प्रमाणात नासधूस गवा रेडयांकडून झाली आहे . या नुकसानीचे शासनाने पंचनामे करुन आर्थिक नुकसान भरपाई दयावी . अशी मागणी होत आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks