ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मोठी बातमी : तांदूळ स्वस्त होणार ! केंद्र सरकारकडून तांदळाच्या किमती तात्काळ कमी करण्याचे दिले निर्देश

गेल्या काही दिवसांपासून देशात तांदळाच्या किंमती वाढल्या आहेत. यावर आता मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे आता बाजारपेठेतील तांदळाच्या किमती कमी होतील आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने तांदळाच्या किरकोळ किमती तात्काळ कमी करण्याचे निर्देश तांदूळ उद्योग संघटनेला दिले आहेत.
या संदर्भात, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी गैर-बासमती तांदळाच्या देशांतर्गत किमतीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती.
यामध्ये हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या बैठकीत तांदळाच्या किमतींवर चर्चा झाली, चोप्रा यांनी उद्योगांना देशांतर्गत बाजारात भाव वाजवी पातळीवर आणण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले.