ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : शिवगंगा महिला दुध संस्थेच्या चेअरमनपदी अश्विनी गिरी यांची बिनविरोध निवड

चंदगड प्रतिनिधी : रुपेश मऱ्यापगोळ
सुंडी ता.चंदगड येथील शिवगंगा महिला दुध संस्थेच्या चेअरमनपदी अश्विनी चंद्रकांत गिरी यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून साधना मारुती मोर्ये बिनविरोध निवड करण्यात आली.तर संचालक म्हणून सौ.सरिता यादु पाटील (माजी चेअरमन) ,संजीवनी संजय पाटील ,विमल नारायण पाटील , आनंदी विठ्ठल पाटील श्रीमती. नंदा नरसू पाटील, वासंता परशुराम पाटील यांची निवड करण्यात आली.
ही सभा कोल्हापूर निवडणूक निर्णय अधिकारी डी जी तांदळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला सेक्रेटरी सुबराव नारायण पाटील,एन एम पाटील साहेब, यादु पाटील, अमृत बोंगाळे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.