ताज्या बातम्या

निढोरीमध्ये संविधान सन्मान संवादसभा

NIKAL WEB TEAM :

आम्ही भारतीय नागरिक आहोत आणि संविधान हाच सर्व भारतीयांना एकवटविणारा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. त्यामुळे संविधान जिंदाबाद जिंदाबाद अशा घोषणा देत संविधान सन्मान संवादसभा संपन्न झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक वाय.एस.कांबळे सर होते.स्वागत व प्रास्ताविक विकास सावंत यांनी केले.

मनुवादी व्यवस्थेने घालुन दिलेल्या नियमाप्रमाणे शिवरायांचा राज्याभिषेक नाकारणाऱ्या, माणसाला पशुपेक्षाही हिन दर्जाची वागणुक देणाऱ्या,वर्णव्यवस्था व जातीव्यवस्थेचं समर्थन करणाऱ्या,शिक्षण नाकारणाऱ्या,गुलामगिरी रुजवत ठेवणार्‍या या मनुवादी व्यवस्थेचा बदला ग्रंथप्रेमी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ग्रंथ जाहीरपणे नाकारुन 25 डिसेंबर 1927 रोजी घेतला व न्याय ,स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यावर आधारलेली,गुलामगिरीची साखळी तोडणारी,मनुष्याला आत्मप्रतिष्ठेनी जगु देणारी,संपूर्ण देशाला एकवटविणारी नवी व्यवस्था संविधानाच्या रूपाने देऊ केली म्हणुनच 25 डिसेंबर हा दिवस संविधान सन्मान दिवस म्हणून साजरा करत असल्याची भावना उपस्थितांनी या संवाद सभेत व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या दरम्यान संविधान जनजागृतीसाठी ‘विवेक पसरवू जनाजनात,संविधान जागवू मनामनात’,’नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली लोकशाही’,’लोकशाहीचा जागर, संविधानाचा आदर’,’संविधान आहे महान,सर्वांना हक्क समान’, ‘डरने की क्या बात है,संविधान हमारे साथ है’,’संविधानाने दिला मान, स्त्री-पुरुष एकसमान’ अशा प्रबोधनात्मक घोषणांद्वारे मानवी जीवनातील संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या मुद्यावर विशेष संवाद घडवून आणला.या कार्यक्रमाची सांगता भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन केली.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य सचिव महेश धम्मरक्षीत, प्रा.डाॅ.प्रदीप कांबळे, राम पोवार,स्मिता कांबळे, तक्षशिला कांबळे यांनी मनोगताद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी सरपंच अमित पाटील, एम.टी.सामंत,जयवंत हावळ,प्रविण सुर्यवंशी,सचिन सुतार,ओंकार कांबळे,पापा जमादार,शंकर कांबळे,अनिल सिद्धेश्वर,सुरज कांबळे,सारीका पाटील,अंनिसचे सचिव विक्रम पाटील,धिरज कांबळे,सुनिल माने, प्रभाकर कांबळे,दयानंद सागर,बी.एम.कांबळे,शस्त्रसंग्रहक समाधान सोनाळकर, संजय कांबळे, अभिजीत डवरी,बी.एल.कांबळे,बाजीराव चौगले, सिद्धेश डवरी,विलासभाई कांबळे यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा-मुरगुड, निसर्ग मित्र मंडळ मुरगुड,भारतीय बौद्ध महासभा,ज्येष्ठ नागरीक संघ मुरगुड व विविध संघटनांचे पदाधिकारी,कार्येकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks