कसबा बीड येथील सरकारी पाणंदी रस्त्याच्या दुरुस्तीला प्रारंभ

सावरवाडी :
करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील नकाशामधील नोंद असलेल्या सरकारी पाणंदी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ करण्यात आला . करवीरच्या तहशिलदार शीतल मुळे भांबरे यांच्या हस्ते पाणंदीच्या अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ झाला .
शेती क्षेत्रातील नोंदणीकृत सरकारी पाणंदीच्या रस्त्यांचे रुंदीकरण , खडीकरण , व दुतर्फा वाढलेले अतिक्रमणे काढण्यात आली . अनेक वर्षापासुन सरकारी पाणंदीच्या रेंगाळलेल्या कामांना चालना मिळाली आहे . पाणंदीच्या दुरुस्तीमुळे शिवारातील दळणवळण ऊस वाहतुकीची सोय होणार आहे .
यावेळी करवीरच्या तहशिलदार शीतल मुळे भांबरे . करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी , करवीरचे गटविकास अधिकारी जयंत उगले, सर्कल प्रविण माने , तलाठी एन. पी. पाटील , ग्रामसेवक एस. बी. पाटील .डी एम सूर्यवंशी, दिनकर गावडे, पांडुरंग कदम भगवान चौगले आदि उपस्थितीत होते .