ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर (NAAC) A+ मुल्यांकन दंत महाविद्यालयास सर्व सुविधा पुरविणार : नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची ग्वाही

नागपूर येथे नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे शुभ हस्ते शासकीय दंत महाविद्यालयातील अधीकारी व कर्मचाऱ्यांचा अभिनंदन सोहळा पार पडला. (NAAC) द्वारे A+ दर्जा प्राप्त झाल्याचे निमित्य साधुन आयोजीत या सोहळयास श्री. दिनेश वाघमारे -प्रधान सचिव, डॉ. दिलीप म्हैसेकर- संचालक, डॉ. विवेक पाखमोडे- सहसंचालक ( दंत ), डॉ. राज गजभिये- सहसंचालक, प्रादेशिक कार्यालय. तसेच डॉ. अभय दातारकर – अधिष्ठाता आदी प्रमुख मान्यवर मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले व सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहचायला हव्या, अशी आशा व्यक्त केली. दंत महाविद्यालयास आवश्यक सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या जागा एप्रिल- २०२४ पर्यंत भरले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. दंत सुपर स्पेशालीटी इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यास आवश्यक अतीरीक्त निधी हा तात्काळ प्राप्त करून दिला जाईल, असे त्यांनी सांगीतले. हे सर्व नजीकच्या काळात पूर्ण केले जाईल, असे प्रतीपादन केले. नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला आवश्यक वाढीव पदव्युत्तर जागा निश्चित भरल्या जातील, अशी ग्वाही दिली.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर हि मध्य भारतातील सुप्रसिद्ध दंत शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेद्वारे नागपूर व मध्य भारतातील लोकांसाठी मौखिक आरोग्य सेवा प्रदान केली जाते. A+ मूल्यांकन प्राप्त करणारे हे महाराष्ट्र राज्यातील पहिलेच शासकीय दंत महाविद्यालय आहे. पहिल्याच मान्यताचक्रात ३.३३ चा उत्कृष्ठ CGPA मिळालेला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद ( NAAC ) द्वारे A+ मुल्यांकन हे या संस्थेची शैक्षणिक उत्कृष्ठता, नव कल्पना आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाची बांधीलकी दर्शवीते. तसेच सदरील संस्थेत दंत चिकित्से बाबत सर्व समावेश व जागतीक दर्जाचे शिक्षण प्रदान करण्याच्या क्षमता स्पष्ट करते. संस्थेचा विद्यार्थी केंद्रीत दृष्टीकोण, नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती आणि दर्जेदार रुग्णसेवा यामुळे सदरील A+ नामांकन प्राप्त झाले आहे.

याप्रसंगी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते डॉ. विनय हजारे, डॉ. राम ठोंबरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. NAAC, संचालन समितीचे सदस्य डॉ. ज्योती मनचंदा, डॉ. शुभा हेगडे, डॉ. वर्षा मानेकर, डॉ. नुपूर निनावे, डॉ. दमयंती आतराम, डॉ. दिपक घाडगे, डॉ. चेतन फुकाटे, डॉ. रानू इंगोले, डॉ. शिल्पा वऱ्हेकर, तसेच सर्व विभागप्रमुख डॉ. मंगेश फडनाईक, डॉ. मंजुषा वऱ्हाडपांडे, डॉ. रितेश कळसकर, डॉ. अरुण खळीकर, डॉ. प्रशांत पंदिलवार, डॉ. अशिता कळसकर, डॉ. सचिन खत्री, डॉ. अमित पराते तसेच श्रीमती नंदिनी न्यालेवार आणि श्री. अनिल निमसरकर यांचे देखिल अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वितेकरीता डॉ. विवेक ठोंबरे, डॉ. महेश सानप, डॉ. अक्षय ढोबळे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. वैभव कारेमोरे तसेच आभार प्रदर्शन डॉ. ज्योती मनचंदा यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks