ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीच्या तारखा १३ मार्चनंतर जाहीर होण्याची शक्यता ; ७ ते ८ टप्प्यात होऊ शकतं मतदान?

लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या तारखांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीच राजकीय पक्षांनी आधीच तयारी सुरू केली आहे. आता निवडणूक आयोग लवकरच सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करू शकते. निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचे अधिकारी देशातील अनेक राज्यांना भेटी देत आहेत. दरम्यान १३ मार्चनंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात, अशी बातमी समोर येत आहे. ७ ते ८ टप्प्यात मतदान होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निवडणूक आयोग १३ मार्चनंतर लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करू शकते. देशातील निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे पथक राज्यांच्या दौऱ्यावर आहे. तसेच कोणत्या राज्यात किती टप्प्यात आणि कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रियाचे नियोजन करता येईल, याचा आढावाही त्यांच्याकडून घेतला जात आहे. सध्या निवडणूक अधिकाऱ्यांची टीम तामिळनाडूमध्ये आहे. त्यानंतर ते उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. १३ मार्चपूर्वी राज्याचे दौरे पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे. अशातच १३ मार्च रोजी किंवा त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks