कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका स्तरावरील व गाव स्तरावरील १९ समित्या तात्काळ स्थापन करण्याबाबत मनसेचे आवेदन

महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना कोल्हापूरच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालय व ग्रामपंचायत यांना मनसेचे जनाधिकार सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज येडूरे यांच्या वतीने आवेदन देण्यात आले.
या आवेदनामध्ये म्हटले आहे की लोकशाहीतील प्रत्येक निर्णय हा लोकहिताचा आणि संरक्षणासाठी असतो. प्रत्येक शासन लोकहिताचे विविध निर्णय घेत असते. परंतू बरेच वेळा अशा निर्णयांची अंमलबजावणी होत नाही. किंवा जरी झाली तरी ती सदोष असते. या सर्व बाबी विचारात घेवून प्रशासकीय कामात समाजातील तज्ञ, समाजसेवक, विविध घटकातील प्रतिनीधी इ. चा समावेश करण्यात येतो.
असा समावेश करून विविध समित्या स्थापन करून सदस्यांची निवड करण्यात यावी. तालुक स्तराचा विचार केला तर पुढील समित्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या समित्यातून तालुक्याचे बहुतांशी प्रश्न सोडविण्यात मदत होईल.
तालुका स्तरावरील समिती खालील प्रमाणे
1. तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समिती
2. तालुका समन्वय समिती
3. तालुका शांतता समिती
4.तालुका दारूबंदी समिती
5. तालुका दक्षता समिती
6. तालुका दक्षता समिती
7. तालुका व्यवसनमुक्ती समिती
8. तालुका तंटामुक्ती समिती
9. तालुका क्रिडा संकुल समिती
10. तालुका संजय गांधी योजना समिती
11. तालुका नैसर्गिक आपत्ती समिती
12.तालुका जलयुक्त शिवार अभियान आढावा व समन्वय समिती
13. वेठबिगार निर्मुलन दक्षता समिती
14. तालुका दुष्काळ निवारण समिती
15.तालुका कांदळवन संरक्षण व संवर्धन समिती
16. तालुका विशाखा समिती
17. तालुका रूग्ण समिती
18. राजीव गांधी गतीमान प्रशासन अभियान समिती
19. तालुका रोजगार हमी योजना समिती
वरील सर्व समित्यांचे कामकाज त्यांच्या बैठका कार्याचे स्वरूप जर प्रत्येक नागरीकाने समजावून सांगितलं तर निश्चित तालुक्यातील समस्या सोडविण्यात त्याचा उपयोग होणार आहे. तरी आम्ही आपणास या आवेदनाच्या माध्यमातून तालुक्यातील या 19 समिती तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, युवक, प्रतिष्ठित महिला तसेच सर्वपक्षीय नते यांची बैठक घेऊन लवकरात लवकर वरील समिती तालुक्यामध्ये स्थापन कराव्यात ही आपणास नम्र विनंती.सर्व नागरीकांना जेव्हा उपरोक्त समितीतून न्याय मिळेल तेव्हा या आवेदनाचा उद्देश निश्चित साध्य होईल हि आम्हास अपेक्षा मनसेने केली आहे.