ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनाळीत दोन कुंटूंबातील मारामारीत तिघेजण गंभीर जखमी ; चौघांच्यावर मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सोनाळी ता. कागल येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत या मारामारीत लोखंडी रॉड, काठ्या, फरशीचे तुकडे यांचा वापर करण्यात आला असून चौघा जणांच्यावर मुरगूड पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद सौ. वासंती राजेंद्र चौगले यांनी दिली आहे.

याबाबत मुरगूड पोलीसातून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी सौ. वासंती राजेंद्र चौगले हया आपल्या घरास लागुन असलेल्या बांधकामावरील कामगारांना चहा पाणी घेवुन गेल्या होत्या त्यावेळी दिपक दत्तात्रय चौगले, अमित आनंदा चौगले, आनंदा बापुसाहेब चौगले , अल्का दत्तात्रय चौगले यांनी त्यांना शिवीगाळ केली तसेच राहूल यास आनंदा चौगले यांनी आपले हातातील लोखंडी रॉडने डोकीत मारहाण केलेने राहुल हा खाली बसला त्यावेळी दीपक. चौगले व अमित चौगले यांनी राहुलचे पाठीत काठीने तसेच लाथाबुक्यांने मारहाण करून जखमी केले सर्वांनी फिर्यादी यांच्या घरात जावुन त्यांचे पती राजेंद्र बापुसाहेब चौगले यांना दीपक चौगले याने रॉडने अमित चोगले यांने काठीने पाठीत, फरशीच्या तुकडयाने मारहाण केली.

या मारामारीत राहूल राजेंद्र चौगले, राजेंद्र बापूसो चौगले, शेखर राजेंद्र चौगले हे तिघेजण जखमी झाले आहेत या मारामारीतील दिपक दत्तात्रय चौगले, अमित आनंदा चौगले, आनंदा बापुसाहेब चौगले, अल्का दत्तात्रय चौगले सर्व रा. सोनाळी यांचेवर मुरगूड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास हे. कॉ. पारळे करीत आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks