मुरगूड ग्रामीण रुग्णालयामध्ये नॉन कोविड ओपीडी सुरू करा – नागरिकांची मागणी

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ग्रामीण रुग्णालयांमध्ये सध्या कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे .त्यामुळे मुरगूड व पंचक्रोशीतील लोकांना इतर आजाराच्या उपचारासाठी नाहक त्रास होत आहे. तरी मुरगुड नगरपालिका इमारतीत ग्रामीण रुग्णालयाने नॉन कोविड रुग्णांसाठी स्वतंत्रपणे ओपीडी सुरू करावी अशी निवेदनाद्वारे मागणी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे करण्यात आली आहे .
सध्या मुरगुडमध्ये कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुरगूड ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे .त्यामुळे मुरगूड तसेच इतर पंचक्रोशीतील लोकांना इतर उपचारासाठी नाहक त्रास होत आहे. यामध्ये सर्पदंश ,गरोदर महिला तपासणी तसेच इतर सर्दी ,ताप ,खोकला या आजारी लोकांना नाहक त्रास होत आहे. याकरिता मुरगुड मध्ये नगरपालिका इमारतीत ग्रामीण रुग्णालयाने नॉन कोविड रुग्णांसाठी स्वतंत्रपणे ओपीडी सुरू करावी अशा मागणीचे निवेदन दत्तात्रय मंडलिक , नवनाथ सातवेकर जमिर मुजावर, दत्तात्रय खोत, अमोल शेलार यांनी कागल तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे दिले आहे .