प्रा.गोविंद अंबी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी पदवी प्रदान

चंदगड प्रतिनिधी :
चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडी गावचे प्रा. गोविंद मारुती अंबी यांना शिवाजी विद्यापीठाने समाजशास्त्र विषयातील पीएच.डी पदवी प्रदान केली त्यांचे पीएचडी प्रबंधाचे शीर्षक “ऑक्युपेशनल मोबिलिटी अमंग द बेरड कम्युनिटी : ए केस स्टडी ऑफ चंदगड तालुका असे आहे.
त्यांनी चंदगड तालुक्यातील बेरड (रामोशी) समाजाच्या व्यावसायिक गतिशीलतेवर सूक्ष्म अभ्यास करून आपल्या संशोधनातून विविध निष्कर्ष काढून शिफारशी केल्या आहेत. त्यांनी पदव्युत्तर चे शिक्षण डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन च्या “कमवा आणि शिका” या योजनेतून पूर्ण केले आहे.
आता सध्या ते श्री स्वामी विवेकानंद संस्थेच्या श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय कापशी, तालुका शाहुवाडी या शाखेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ . जगन कराडे यांचे मार्गदर्शन लाभले. विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रतिमा पवार, प्रा. डॉ. प्रल्हाद माने,प्रा. डॉ. प्रतिभा देसाई, स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार कुमार साळुंखे तसेच सचिवा सौ शुभांगी गावडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ जे डी नदाफ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक मित्र यांचे सहकार्य लाभले.